Featured

news
अशिष विद्यार्थी यांनी ‘प्राइमर्स’चे केले स्वागत, ३५० हून अधिक सहभागींची उपस्थिती







मुंबई | 15 डिसेंबर 2025

५० वर्षांनंतरच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या अनंता क्वेस्ट या उपक्रमाचा भव्य शुभारंभ 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे पार पडला. पहिल्याच एकदिवसीय लाइफ स्ट्रॅटेजी कन्व्हेन्शनमध्ये ३५० हून अधिक सहभागी एकत्र आले होते.

या कन्व्हेन्शनमध्ये वेलनेस, वेल्थ मॅनेजमेंट, भावनिक आरोग्य, परफॉर्मन्स कोचिंग, उद्देशपूर्ण जीवनशैली आणि डिजिटल सुरक्षितता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. भारतातील 50 ते 65 वयोगटासाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग्स’कडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास प्रेरणा देणे हा होता.






कार्यक्रमात अभिनेता व मोटिवेशनल स्पीकर *अशिष विद्यार्थी, ह्यूमन परफॉर्मन्स आर्किटेक्ट **श्यामल वल्लभजी*, डॉ. भाविन जांखारिया, अकांक्षा श्रीवास्तव, डॉ. आदित्य नायर, दीपा सोमन, डॉ. रेनुका आणि डॉ. अनिल ब्राडू यांच्यासह अनेक नामवंत तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. अनुभवाधारित सत्रे, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक चर्चांमधून सहभागींच्या आरोग्य, आर्थिक नियोजन, नातेसंबंध आणि दीर्घकालीन कल्याणावर भर देण्यात आला.

अनंता क्वेस्टचे संस्थापक व सीईओ *संजय मेहता* म्हणाले,
“५०+ समुदाय या टप्प्यावर स्पष्टता, जोडणी आणि अर्थपूर्ण मार्गदर्शन शोधत आहे. अनंता क्वेस्ट ही आत्मचिंतन, शिकणे आणि संवादासाठीची एक सुरक्षित व प्रेरणादायी जागा आहे.”



यावेळी बोलताना अशिष विद्यार्थी म्हणाले,
“‘पिक्चर अभी बाकी है’ हा विचार प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. अनंता क्वेस्टमध्ये समान प्रश्न आणि आशा घेऊन आलेल्या लोकांना भेटून हे जाणवले की आपण सगळे मिळून आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुंदर आणि अर्थपूर्ण बनवू शकतो.”

अंतिम सत्रात श्यामल वल्लभजी यांनी स्पष्ट केले की,
“वारसा हा आयुष्याच्या शेवटी नाही तर आपण जगतो त्या प्रत्येक क्षणात घडत असतो. स्पष्टतेने आणि जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय पुढील प्रवासाला अधिक प्रभावी बनवतात.”

५०+ समुदायासाठी विचारपूर्वक क्युरेट केलेले अनुभव आणि कृतीयोग्य लाइफ-डिझाइन फ्रेमवर्क्स देणारा हा कन्व्हेन्शन अनंता क्वेस्टच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.





अनंता क्वेस्ट विषयी

अनंता क्वेस्ट ही ५० वर्षांनंतरच्या आयुष्याची नवी व्याख्या करणारी चळवळ आहे. आरोग्य, संपत्ती आणि समुदाय या तीन स्तंभांवर आधारित हे व्यासपीठ यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम भारतीयांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यात उद्देश, ओळख आणि स्वातंत्र्य शोधण्यासाठी मार्गदर्शन करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने