सतीश पाटील यांना आईसमोरच मारहाण केल्याचे
आणि माफी मागायला लावल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Raigad Agri Community VIDEO: रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये मनसे कार्यकर्त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. मनसे नेते सतीश पाटील यांनी भाजप आमदार महेश बिलादी याच्याविरोधात बोलल्याने ही मारहाण करण्यात आली. सतीश पाटील यांना आईसमोरच मारहाण केल्याचे आणि माफी मागायला लावल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या मारहाण प्रकरणानंतर आता रायगडमधील आगरी बांधव आक्रमक झाला आहे.
नेमकं काय घडतंय?
उरणमध्ये मनसे कार्यकर्ता सतीश पाटील याला भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उरणमधील परप्रातियांना आगरी बांधवांनी, स्थानिकांनी पाठिंबा देऊ नये. तसेच आमदार महेश बिलादी, कौशिक शहा यांच्या समर्थकांनी आगरी समाजाबद्दल बोलून दाखवावे, तुम्हाला उरणमध्ये येऊन तुडवू, असा थेट इशाराच आगरी समाज बांधवानी दिला आहे.
तुमचे राजकारण चुलीत घाला, पण समाजावर काही बोलू नका, एका
माणसाला तुम्ही 200 लोक येऊन घेरता, तुम्ही डॉन झाले का? पोलीस प्रशासन काय
करते? भूमिपुत्रांना भररस्त्यात मारहाण व्हायला लागली, उरणचे स्थानिक कुठे
आहेत? असा सवाल करत पनवेलमध्ये मात्र असा प्रकार होऊ देणार नाही, असंही
रुपेश मुंबईकर यांनी म्हटलं आहे.
'पनवेलमध्ये हे चालणार नाही...'
दरम्यान, आम्ही गावागावात मिटींग घेत आहोत. उरणमध्ये जो प्रकार घडला, आमच्या भावाला मारहाण करण्यात आली. आम्ही त्या घटनेचा तीव्र निषेध करतो. ते उरण असेल, तिथे लाचार लोक राहत असतील मात्र पनवेलमध्ये हे चालणार नाही. पनवेलमध्ये अशी घटना केली तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, असे म्हणत आगरी समाज एकवटला आहे. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा