गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात आता पूजा गाकवाड हे नाव समोर आले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिच्या लाईफस्टाईलची आता सगळीकडे चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्यातील लुखामसला या गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या सासुरे या गावात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजा गोविंद बर्गे यांना बोलण्यास टाळाटाळ करत होती. यातूनच त्यांनी स्वत:ला संपवले आहे. दरम्यान, आता पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांच्याकडून सोने, दागिने तसेच पैसे घेतल्याचा दावा केला जातोय. असे असतानाच आता तिच्या लाईफस्टाईलबद्दल बोललं जातंय.
पूजाने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ केले पोस्ट
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड या 21 वर्षीय नर्तकीला
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आत्महत्येची आता पोलीस सखोल चौकशी करत
आहेत. एकीकडे ही चौकशी चालू असतानाच पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील
पोस्टची चर्चा चालू आहे. पूजाने तिच्या खात्यावर काही व्हिडीओ पोस्ट केलेले
आहेत. काही व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिचे हेच व्हिडीओ
पाहून तिच्या लाईफस्टाईलबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
चमचम साडी, बोटात अंगठ्या
पूजा गायकवाड कलाकेंद्रात नृत्य करायची असे म्हटले जाते. तिने
इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. यातील काही व्हिडीओंमध्ये
पूजाने काळ्या, नारंगी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे
बहुसंख्या व्हिडीओंमध्ये पूजाच्या दोन्ही हातांच्या दहापैकी आठ बोटांत
अंगठ्या असल्याचे दिसत आहे. पूजाच्या याच राहणीमानाची सध्या चर्चा होत आहे.
आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल, चौकशी सुरू
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आपली चौकशी चालू केली आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय-काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा