भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितरांचा गणला जातो. या काळात
पितरांचा दोष निवारण्यासाठी विधी केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार,
एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याला अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे या काळात श्राद्धकर्म आणि पिंडदान करणं गरजेचं आहे.
पितरांचा आत्मा असंतुष्ट असला की पितृदोष लागतो. तसेच मृत्यूनंतर श्राद्ध,
तर्पण, पिंडदान यांचं योग्य पद्धतीने पालन केलं नाही, तर पितृदोष लागतो. हा
दोष व्यक्तीच्या कर्मानुसार लागतो. चांगली कर्म असतील तर पितृदोषाचा
प्रभाव कमी असतो.
पितृदोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक चढ
उतार आयुष्यात येतात. त्यामुळे कधी कधी संकटं का येतात हे देखील कळत नाही.
पितृदोष फक्त एकाच पिढीला नाही तर येणाऱ्या पिढ्यांनाही भोगावा लागू शकतो.
त्यामुळे जीवनात अनेक अडचणींचा डोंगर उभा राहतो.
गरूड पुराणानुसार, पितृदोष हा तीन ते सात पिढ्यांपर्यंत प्रभाव टाकतो.
सामन्यापणे वडील, आजोबा आणि पंजोबापर्यंत हा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे
त्यांच्या मृत्यूपश्चात सर्व विधी व्यवस्थित पार पडणं आवश्यक असतं, असं
धार्मिक शास्त्र सांगतं.
पितृदोषाचं सर्वात मोठं कारण म्हणे जे लोकं पितरांचं आणि पूर्वजांचं
श्राद्ध कर्म किंवा तर्पण करत नाही अशा लोकांच्या कुटुंबियांना पितृदोष
लागतो. पितृदोष दूर करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणं आवश्यक
आहे, असं धार्मिक शास्त्रात सांगितलं आहे.
पितृदोषामुळे मूलबाळ न होणं, विवाहात अडचणी येणे, व्यवसायात आर्थिक फटका
बसणे, आरोग्य ढासळणे, कुटुंबात कोणी ना कोणी आजारी पडेल, घरात कायम तणावाचं
वातावरण असणे हे पितृदोषाची कारणे आहेत, असं धार्मिक शास्त्र सांगतं.
(सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)
टिप्पणी पोस्ट करा